मुंबईत टीव्ही अभिनेत्रीवर भररस्त्यात हल्ला

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीवर मुंबईच्या वर्सोवा परिसरात मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी हल्ला केला. यात ती जखमी झाली आहे. पोलिसांनी काही तासांच्या आतच दोघा हल्लेखारांना गजाआड केलं.

रुपाली गांगुली चार वर्षाच्या मुलाला शाळेत घेऊन जात होती. त्याचवेळी दोन तरुण मोटरसायकलवरून आले. त्यांनी रुपालीची कार थांबवली आणि तिच्याशी वाद घातला. दोघांनी कारची काच फोडून रुपालीवर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच तेथे पोलीस पोहोचले. त्यांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दोघांनाही काही तासांच्या आत पोलिसांनी अटक केली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*