आंबिवलीजवळ तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वे उशिराने

मध्य रेल्वेवरील कल्याण-कसारा मार्गावर आंबिवली स्थानकाजवळ लोकलमध्ये सकाळी तांत्रिक बिघाड झाला. लोकल तासभर आंबिवली स्थानकात थांबवण्यात आली होती. त्यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

कल्याण-कसारा लोकल सकाळी ७ वाजता आंबिवली स्थानकात जात होती. त्यावेळी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे लोकल आंबिवली स्थानकात थांबवण्यात आली होती. कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक एक तास खोळंबली होती. कल्याण कारशेडमधून पाचारण केलेल्या इंजिनाच्या साह्याने लोकल मार्गस्थ करण्यात आली आहे, अशी माहिती प्रवासी संघटनेनं दिली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*