नालासोपाऱ्यात बॉम्ब, शस्त्रांचा कारखाना

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेला हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता वैभव राऊत याने नालासोपाऱ्यातील आपले घर आणि दुकानात बॉम्ब व शस्त्रे बनविण्याचा कारखानाच सुरू केला होता, असे एटीएसच्या ताज्या छाप्यांमधून उघड झाले आहे. वैभवच्या घरातून सोमवारी आणखी शस्त्रसाठा जप्त केला. आठ पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि अन्य साहित्य यावेळी पोलिसांना सापडले. वैभवने तयार केलेले बॉम्ब तसेच शस्त्रे वितरीत केली असावीत, असा संशय एटीएसला असून त्या दृष्टीने चौकशी सुरू आहे.

हा कारखाना ‘तोच’?

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित आरोपी विरेंद्र तावडे आणि याच प्रकरणात फरार असलेला सागर आकोलकर यांनी एकमेकांना काही ई-मेल पाठविले होते. यातील काही मेलमध्ये ‘महाराष्ट्रात कारखाना सुरू करण्याची गरज आहे’, असे म्हटले आहे. तो हाच कारखाना आहे का? वैभव राऊत, शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का? याचा तपास एटीएसचे अधिकारी करीत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*