वाहतूक नियम मोडला; सलमानच्या भावोजीला दंड

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा भावोजी आयुष शर्मा हा ‘लवरात्री‘ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोमवारी गुजरातमधील वडोदरामध्ये गेले होते. पण या चित्रपटाचं प्रमोशन आयुषला चांगलंच महागात पडलं. विनाहेल्मेट बाईक चालवल्यानं वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरीना हुसैन वडोदरामध्ये सोमवारी संध्याकाळी ‘लवरात्री’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले होते. आयुष आणि वरीनानं संध्याकाळी पाचच्या सुमारास हरनी विमानतळ ते सुरसागर तलाव या मार्गावर विनाहेल्मेट बाईक चालवली. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. विनाहेल्मेट बाईक चालवणाऱ्या आयुष आणि वरीनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर वाहतूक पोलीस रात्री आयुष आणि वरीना थांबलेल्या हॉटेलवर पोहोचले. तेथे त्यांनी दोघांनाही चलान फाडायला लावलं. दोघांकडून प्रत्येकी शंभर रुपये दंड वसूल केला. ‘आयुष आणि वरीना ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तेथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलं. वाहतूक नियम मोडणाऱ्या सेलिब्रिटींकडून दंड वसूल करण्यास सांगितलं. सेलिब्रिटींनी जबाबदारीचं भान ठेवायला हवं. वाहतूक नियमांचं पालन केलं पाहिजे,’ असं वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमिता वनानी यांनी सांगितलं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*