सीसीटीव्ही फूटेजची तपासणी

जेएनयूमधील विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावर नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी नेमके काय झाले, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. काहींच्या म्हणण्यानुसार त्याने हवेत गोळीबार केला. प्रत्यक्ष गोळीबार झाला, की नाही याबाबत पोलिस तपास करीत असून सीसीटीव्हीचे फूटेज तपासले जात आहे, अशी माहिती नवी दिल्लीच्या परिक्षेत्राचे सहपोलिस आयुक्त अजय चौधरी यांनी दिली.

‘आम्ही चहा घेऊन येत असताना मागून एक जण आला. त्याने मला ढकलून दिले आणि गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी मी पळाल्याने वाचलो. हल्लेखोर तेथून पळून गेला. मी त्याचा चेहरा पाहू शकलो नाही. त्याच्याबरोबर कुणी इतर होते, की नाही ते माहीत नाही,’ अशी माहिती खालिद याने दिली.

संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीला विरोध करताना देशाविरोधात घोषणाबाजी झाल्याचे प्रकरण २०१६मध्ये गाजले होते. ‘जेएनयू’च्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमानंतर खालिद याच्यासह कन्हैयाकुमारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्यापीठाने नुकताच त्याचा पीएच. डी.चा प्रबंध नाकारला आहे. त्याविरोधात त्याने न्यायालयात धाव घेतली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*