…तर भारतीयांचे आयुर्मान चार वर्षांनी वाढेल

हवेच्या प्रदूषणामुळे भारताचे होत असलेले आर्थिक नुकसान वार्षिक ०.५ लाख कोटींहूनही अधिक असून त्यामुळे देशातील लाखो लोकांना अल्पायुष्य तसेच आजारपणाचा सामना करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या निकषांनुसार हवेचा दर्जा साध्य करण्यात भारताला यश आले, तर भारतीयांचे आयुर्मान सरासरी चार वर्षांनी वाढेल, असे निष्कर्ष अमेरिकेतील एका संशोधनांती काढण्यात आले आहेत.

शिकागो विद्यापीठ आणि हार्वर्ड केनेडी स्कूल यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘अ रोडमॅप टुवर्ड्स क्लीनिंग इंडियाज एअर’ या अहवालात हे निष्कर्ष काढण्यात आले असून हवेच्या दर्जाच्या सुधारणेसाठी काही शिफारशीही करण्यात आलेल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या दर्जासाठी पीएम२.५ या प्रदूषकाचे प्रमाण घनमीटरमागे वार्षिक सरासरी १० ग्रॅम तर २४ तासांसाठी सरासरी २५ ग्रॅम असे निश्चित केले आहे. पीएम१० या प्रदूषकाबाबत हे प्रमाण अनुक्रमे २० ग्रॅम व ५० ग्रॅम आहे. पीएम२ या प्रदूषकाचे प्रमाण देशातील निकषाहून अधिक असलेल्या भागात तब्बल ६६ कोटी भारतीय राहत असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*