आदीवासी मुलांसाठी फराळ आणि कपडे वाटप

नवी मुंबई – दिवाळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट, फराळाचा आस्वाद अन् फटाक्यांची आतिषबाजी हे नेहमी दिसणारे चित्रआपल्या डोळ्यासमोर येते. असे असले तरी, शहरी भागापासून दूर ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यावस्तींवर,कसे तरी उभ्या असलेल्या कुडाच्या झोपडीतील आदिवासींचे चित्र म्हणजे अगदी त्याउलट. तिथे दिवाळी सण असो अथवा इतर कुठलाही सण म्हणजे एकप्रकारे अनेक कोस दूरचे अंतर. अशा या आदिवासी दिनदुबळ्यांच्या जीवनातया आदिवासींना जुने कपडे आणि फराळाचे साहित्य वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणीत केला जाणार आहे.
नवी मुंबईतील घणसोली येथील आदर्श सेवा संस्थेच्या माध्यमातून  दिवाळीच्या फराळाचे पदार्थ आणि कपडे वाटप हे उपक्रम रविवारी ता.४ रोजी घणसोलीत झोपडपट्टी परिसरातील गोर्गारीबासाठी राबविण्यात आला. सलग तीन दिवस शहरातील नागरिकांकडून फराळ व कपडे जमा करण्यात आले असून एक वस्त्र मोलाचें अंतर्गत विविध प्रकारचे कपडे, स्वेटर, ब्लॅकेट, साड्या आदींचा समावेश होता. ही सर्व पाकीटे, कपडे तसेच जमा झालेली खेळणीलवकरच आदिवासी व कष्टकरी वाड्यावस्त्यांवर वाटप करण्यात येणार आहे.
ठाणे जिल्हा युवक कॉन्ग्रेचे नेते निशांत भगत यांनी या सामाजिक कार्याला प्रमुख उपस्थिती दर्शविली. उमेश जुनघरे, विजय [पाटील,राहुल दळवी,बिपीन गायकवाड,प्रतिक सुळे,सुशांत पार्टे,सागर शिरुलकर,प्रकाश दुधाने,आदींच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांना फराळ तसेच कपड्यांचे वाटप करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली असून येत्या दोन ते तीन दिवसात या दुर्गम भागात आदिवासींना वाटप करण्यात येईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*