महाराष्ट्र
Trending

वाईन शॉप, देशी मद्यविक्री दुकानांसाठी ‘ना हरकत’ बंधनकारक

राज्यातील वाईन शॉप तसेच किरकोळ देशी व विदेशी मद्य विक्री दुकानांच्या स्थलांतर प्रक्रियेत आता संबंधित नोंदणीकृत सोसायटीची ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घेणे अनिवार्य राहणार आहे. भविष्यात या निर्णयाची राज्यभर काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

नागपूर: येथे सुरू असलेल्या अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी–रहाटणी परिसरातील नियमबाह्य दारू दुकानांचे परवाने रद्द करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, वाईन शॉप आणि देशी दारू दुकानांचे स्थलांतर होणार असेल तर सोसायटीच्या संमतीशिवाय ते शक्य होणार नाही.

पिंपरी-चिंचवडमधील बजाज देशी दारू दुकान आणि विक्रांत वाईन्स शॉप या दोन्ही दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र, यापैकी एका दुकानाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे पुढील कार्यवाही न्यायालयाच्या आदेशानुसार केली जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे नागरिकांच्या संमतीशिवाय निवासी भागात दारू विक्री केंद्रे स्थलांतरित करण्याच्या प्रकारांना आता ‘ब्रेक’ बसणार असून, स्थानिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button