
महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ‘ धुरंधर ‘! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे परिषदेत आठवडा प्रस्तावावर बोलताना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर घणाघाती टीका केली.
नागपूर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यातील भाषणात मुंबईतील विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, काही विरोधक फक्त बिनबुडाचे आरोप करत राहतात, काही पर्यटनासाठी येऊन जातात, पण जनतेच्या प्रश्नांसाठी काही करत नाहीत.
शिंदेंच्या म्हणण्यानुसार, मुंबईकरांसाठी सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत – ओसी नसलेल्या 20 हजार इमारतींना दिलासा, 13 हजार इमारतींच्या पुनर्विकासासाठी मार्ग मोकळा करणे, नॅशनल पार्क कर्मचाऱ्यांसाठी पर्यायी घरे, सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करणे, 50 एकरापेक्षा मोठ्या भूखंडावर क्लस्टर पुनर्विकास योजना इत्यादी.
उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केले की, मुंबईच्या तिजोरीवर डाका घालून भ्रष्टाचार करणारा खरा ‘रेहमान डकैत’ कोण आहे, हे लोकांसमोर यायला हवे, आणि अशा डकैतना पाणी पाजणारी ‘धुरंधर’ महायुतीच ठरेल.



