मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, एकूण 94 उमेदवार लढणार

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP – अजित पवार गट) यांनी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीत पक्षाने 30 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.
मुंबई: 30 डिसेंबर 2025 या उमेदवारी अर्जाच्या अंतिम तारखेला सर्व पक्षांनी अर्ज दाखल करण्याची चाळणी पूर्ण केली आहे. आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून, यामुळे पक्षाचे एकूण 94 उमेदवार रिंगणात उतरले असल्याचे निश्चित झाले आहे.
या यादीत 30 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीनं पहिल्या यादीत 37 उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली. दुसऱ्या यादीत 27 तर तिसऱ्या यादीत 30 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज 30 उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये एकूण 94 जागांवर उमेदवार उभे केले असून पूर्ण ताकदीने व क्षमतेने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर
१) मुरारी बच्चनचंद्र झा (वॉर्ड क्रमांक २३)
२) सुरेंद्र लांडगे (वॉर्ड क्रमांक २६)
३) मयुरी महेश स्वामी (वॉर्ड क्रमांक ३८)
४) सुमन इंद्रजीत सिंग (वॉर्ड क्रमांक ३९)
५) भक्ती नाथन चेट्टी (वॉर्ड क्रमांक ४७)
६) राकेश कोहल्हो (वॉर्ड क्रमांक ५९)
७) आफरीन तोले (वॉर्ड क्रमांक ६१)
८) मालीकचंद यादव (वॉर्ड क्रमांक ६३)
९) ट्विंकल परमार (वॉर्ड क्रमांक ७९)
१०) सुरेखा सरोदे (वॉर्ड क्रमांक८३)
११) प्रविणा सावंत (वॉर्ड क्रमांक ८८)
१२) संदीप उधारकर (वॉर्ड क्रमांक ८७)
१३) झाहीद खान (वॉर्ड क्रमांक १०२)
१४) रश्मी मालुसरे (वॉर्ड क्रमांक ९४)
१५) सौरभ साठे (वॉर्ड क्रमांक १४१)
१६) भारती बावदाने (वॉर्ड क्रमांक १२३)
१७) वर्षा तुळसकर (वॉर्ड क्रमांक १५८)
१८) निखिल भिलये (वॉर्ड क्रमांक १४९)
१९) संतोष गवळी (वॉर्ड क्रमांक १६२)
२०) प्रदीप पोखरकर (वॉर्ड क्रमांक १६०)
२१) राजेश्री खाडे (वॉर्ड क्रमांक १८३)
२२) शबाना खान (वॉर्ड क्रमांक १७४)
२३) खुशी नंदपल्ली (वॉर्ड क्रमांक १८८)
२४) अरुणा खंदारे (वॉर्ड क्रमांक १८६)
२५) अभिजीत नागवेकर (वॉर्ड क्रमांक १९३)
२६) आशा भालेकर (वॉर्ड क्रमांक १८९)
२७) निलम कांबळे (वॉर्ड क्रमांक १९६)
२८) पूजा पवार (वॉर्ड क्रमांक १९४)
२९) सौरभ पेडणेकर (वॉर्ड क्रमांक २०७)
३०) रामवचन मुराई (वॉर्ड क्रमांक २०६)
महायुतीमध्ये सत्तेत असूनही, मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी आपली स्वतंत्र 94 उमेदवारांची यादी जाहीर करून, पक्ष स्वबळावर जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या मानसुब्यात रिंगणात उतरला असल्याचे सिद्ध होत आहे.



