भाजपचे दिपक बडगुजर यांनी प्रभाग २५ (ड) मधून उमेदवारी मागे घेतली! खरे कारण आले समोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार भाजपचे उमेदवार दीपक बादगुजार यांनी एबी फॉर्म मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, याचे खरे कारण आता समोर येत आहे.
नाशिक : नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपचे उमेदवार दिपक सुधाकर बडगुजर यांनी प्रभाग क्रमांक २५ ड मधून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
आज म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येऊ शकतात. दिपक बडगुजर यांनीही या मुदतीत आपला अर्ज मागे घेऊन महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राजकीय सूत्रांनी सांगितले की, या निर्णयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिपक बडगुजर यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक २५ ड मधून उमेदवारी मागे घेतली असली, तरी ते प्रभाग क्रमांक २९ अ मधून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या निर्णयामुळे भाजपाचे रणनितिक पॅटर्न बदलू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.



