महाराष्ट्र
Trending

“देवा म्हणजे नेमके कोण, मी की देव?” फडणविसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “‘देवा’ या शब्दाबाबत माझा संभ्रम आहे.” उद्धव ठाकरे यांनी, “देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर आपलाच असेल,” असे म्हटले होते. त्यावर फडणवीस म्हणाले, “देवा म्हणजे नेमके काय? मी की देव? कारण मला ‘देवा भाऊ’ असेही म्हटले जाते. प्रत्यक्षात ही देवाचीच इच्छा आहे की महापौर महायुतीचाच असेल.”

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महापौर कोण होणार, तो कधी निवडला जाईल, कुठे निर्णय होईल आणि किती वर्षांसाठी हा पदभार सांभाळला जाईल, हे सर्व निर्णय माझ्या, एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली घेतले जातील. या प्रकरणात कोणताही वाद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यातून मुंबई महापौर निवडणुकीत महायुती मजबूत आणि एकजूट असल्याचा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

उद्धवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक शनिवारी उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी, देवाची इच्छा असेल, तर महापौर आमचा होईल, ते माझे स्वप्न आहे. देवाची इच्छा असेल, तर ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. असे विधान करत नवा संभ्रम निर्माण केला होता. दरम्यान असे विधान समोर येत असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगरसेवकांना वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत ‘कहानी मे ट्रिस्ट’ येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button