महाराष्ट्र
Trending

BMC Election 2026: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर, कुख्यात गुन्हेगाराला दिली तिकीट

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत एकूण 37 उमेदवारांचा समावेश आहे. ज्यात एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराच्या नावाचा देखील समावेश आहे.

मुंबई: महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत वॉर्ड क्रमांक 109 मधून सज्जू मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सज्जू मलिक यांच्यावर हत्येचा प्रयत्न यासह विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ते यापूर्वी तडीपार गुन्हेगार म्हणून ओळखले जात होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी उमेदवार निवडीबाबत माहिती देताना सांगितले की, विद्यमान नगरसेवक असलेल्या भागात त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच नव्या पिढीला संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तरुण, युवक आणि महिलांचा उमेदवारांमध्ये समावेश आहे.

केवळ मुंबईतच नव्हे तर अजित पवारांनी पुण्यातून आंदेकर कुटुंबातील तीन जणांना देखील उमेदवारी दिली आहे. यानंतर मुंबईच्या पहिल्या यादीतच सज्जू मलिक या गुन्हेगाराला उमेदवारी दिली असल्याने, सर्वत्र खळबळ उडाली आहे. हे सर्व उमेदवार सोमवारी एबी फॉर्म भरणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button