महाराष्ट्र

विद्यार्थ्यांचा प्रवास आता सुरक्षित व वेळेवर, हेल्पलाइनचा परिणाम

विद्यार्थ्यांच्या ‘बस’ समस्यांवर ‘हेल्पलाईन’ची प्रभावी मात्रा. ३०८ तक्रारींवरून एसटी प्रशासनाला नवी दिशा!

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बससेवेवर अवलंबून असलेल्या लाखो शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००२२१२५१ प्रभावी ठरत आहे. विद्यार्थ्यांची सोय आणि सुरक्षिततेचा हेतू ठेवून सुरू केलेल्या या हेल्पलाईनवर, अवघ्या काही दिवसांत तब्बल ३०८ तक्रारींची नोंद झाली आहे.

ही आकडेवारी तात्पुरती चिंता दर्शवत असली तरी, ती एसटी प्रशासनाला मूलभूत त्रुटी सुधारण्यासाठी मिळालेली एक सुवर्णसंधी आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांकडून नोंदलेल्या प्रमुख तक्रारी

नोंदवलेल्या तक्रारींमधून विद्यार्थ्यांच्या प्रवासाशी संबंधित गंभीर समस्या समोर आल्या आहेत, ज्या आता थेट लक्षात आल्या आहेत:

  • वेळेवर बस न येणे: यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रक प्रभावित होत आहे.
  • बस थांब्यावर न थांबणे: नियोजित थांब्यांवर बस न थांबल्याच्या तक्रारींवर तातडीने लक्ष देण्यात येत आहे.
  • पासधारकांना प्रवेश नाकारणे: लांब पल्ल्याच्या बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यापासून रोखणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची तयारी सुरू आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांनी तात्काळ हेल्पलाईन सुरू करून विद्यार्थ्यांचे म्हणणे थेट प्रशासनापर्यंत पोहोचवले आहे. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षकांना निलंबित करण्याच्या कठोर सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ‘ कामाला न जुमानल्यास कठोर कारवाई ‘ करण्याची मानसिकता निर्माण होऊन व्यवस्थेत सकारात्मक बदल होत आहेत.

मंत्री सरनाईक यांनी एसटीला केवळ तक्रारी नोंदवण्यापुरते मर्यादित न राहता, कर्मचारी व कामकाजात त्वरीत सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित, वेळेवर आणि सन्मानजनक होईल.

ही हेल्पलाइन १०० टक्के निराकरण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, वेळेवर आणि सन्मानजनक प्रवासाची खात्री देणारे ‘विश्वास केंद्र’ बनेल. असे मत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button