महाराष्ट्र
Trending

रंगभूमीतून राजकारणात! भाजपच्या तिकिटावर ‘ही’ अभिनेत्री मुंबई महापालिकेच्या रिंगणात

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रंगभूमीत भाजपाने मराठी अभिनेत्री निशा परुळेकरला उमेदवारी दिली आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीत निशा परुळेकर प्रभाग क्रमांक २५ मधून भाजपचं प्रतिनिधित्व करतील.

मुंबई: अभिनेत्री निशा परुळेकर मराठी रंगमंच आणि चित्रपट विश्वातील नावाजलेली व्यक्ती आहेत. ‘काळुबाई पावली नवसाला’, ‘अशी होती संत सखू’, ‘सासूच्या घरात जावयाची वरात’ तसेच ‘महालक्ष्मी अंबाबाई’ यासारख्या नाटक आणि मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. रंगमंच आणि छोट्या पडद्यावरील त्यांच्या अनुभवामुळे त्या आता राजकारणात पदार्पण करत आहेत.

भाजपमध्ये निशा परुळेकर सध्या सांस्कृतिक प्रकाशच्या सहसंयोजक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग २५ मध्ये राजकीय प्रतिस्पर्धा आणि उत्साह वाढण्याची शक्यता आहे, तसेच मुंबई महापालिकेत भाजपाच्या मोर्चेबांधणीसाठी हा मोठा टप्पा ठरू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button