महाराष्ट्र
Trending

पुणे – म्हाडाच्या सव्वाचार हजार घरांची सोडत आचारसंहितेमुळे लांबणीवर

पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही सोडत ११ डिसेंबरला काढण्यात येणार होती. मात्र आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुणे म्हाडा घरकुल सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे.

पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा) विविध योजनांसाठी काढलेल्या सुमारे सव्वाचार हजार घरांची सोडत आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडली आहे. आचारसंहिता सुरू असल्याने ही सोडत काढता येत नसल्याचे म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही सोडत आता फेब्रुवारीतच होण्याची शक्यता आहे.

पुणे, पिंपरीसह सांगली व सोलापूर जिल्ह्यांत चार हजार १६८ घरांची सोडत म्हाडाकडून काढण्यात आली आहे. या सोडतीसाठी दोन लाख १५ हजार ८४७ अर्ज आले आहेत. अर्जांची संख्या जास्त असल्याने ही सोडत काढण्यास विलंब झाला. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही सोडत ११ डिसेंबरला काढण्यात येणार होती.

मात्र, विक्रमी संख्येने अर्ज आल्यामुळे अर्जांच्या पडताळणीला वेळ लागला. त्यानंतर म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही सोडत १६ किंवा १७ डिसेंबरला काढण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, त्याच आठवड्यात महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली. त्यामुळे ही सोडत काढता आली नाही, अशी माहिती साकोरे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button