महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सर्व 1100 पोलीस ठाण्यांत MahaCrimeOS AI लागू, काय आहे फायदा?

मुंबईत झालेल्या Microsoft AI Tour 2025 दरम्यान मायक्रोसॉफ्टचे सीईओ आणि चेअरमन सत्य नडेला यांनी महाराष्ट्रात MahaCrimeOS AI या एआय-आधारित तपास प्रणालीच्या राज्यव्यापी अंमलबजावणीची घोषणा केली. या आधुनिक तपास प्राणलीमुळे अनेक कामे सोपे होतील.

मुंबई: शुक्रवारी, मुंबईत झालेल्या मायक्रोसॉफ्ट एआय टूर २०२५ दरम्यान, मायक्रोसॉफ्टचे सीईओ आणि अध्यक्ष सत्या नडेला यांनी महाराष्ट्रात महाक्राइमओएस एआयच्या राज्यव्यापी अंमलबजावणीची घोषणा केली. हे एआय-संचालित तपास प्लॅटफॉर्म आता महाराष्ट्रातील सर्व १,१०० पोलिस ठाण्यांमध्ये तैनात केले जाईल, ज्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांचे जलद आणि अधिक प्रभावी निराकरण होण्यास मदत होईल.

सत्य नडेला यांनी आपल्या भाषणात सांगितले की, एआय आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्टचे काम आता प्रत्यक्ष जमिनीवर परिणाम दाखवत आहे. त्यांनी नमूद केले की MahaCrimeOS AI सध्या नागपूरमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहे. या प्रणालीमुळे पोलीस अधिकारी काही मिनिटांत सायबर गुन्ह्यांची नोंद करू शकत आहेत, तर पूर्वी महिन्याभर चालणाऱ्या तपास प्रक्रिया आता एआयच्या मदतीने अधिक जलद पूर्ण होत आहेत.

या कार्यक्रमादरम्यान नडेला यांनी भारतात शेतीसह विविध क्षेत्रांत एआयचा वाढता वापर होत असल्याचेही सांगितले. त्यांनी म्हटले, “आमच्यासाठी तंत्रज्ञानाचा अर्थ नेहमीच लोकांना आणि संस्थांना सक्षम बनवणे हा राहिला आहे. तंत्रज्ञानामुळे आपण काय साध्य करू शकतो आणि नव्या मर्यादांपर्यंत कसे पोहोचू शकतो, याचा पुन्हा विचार करण्याची संधी मिळते.”

MahaCrimeOS AI च्या राज्यव्यापी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील सायबरक्राइम तपास अधिक पारदर्शक, वेगवान आणि प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button