आर्थिक
Trending

भारतीय शेअर बाजार पुन्हा सावरू शकतो, पण… रघुराम राजन यांचे मोठे विधान

राजन म्हणाले की, काही काळापूर्वी संपूर्ण जग भारताच्या ग्रोथ स्टोरीबाबत उत्साही होते. मात्र, टॅरिफ आणि ट्रेड टेन्शनमुळे सध्या थोडी निराशा दिसते. गेल्या जवळपास एका वर्षापासून भारतीय शेअर बाजार फारसा वाढलेला नाही.

मुंबई : माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतीय शेअर बाजाराबाबत महत्त्वपूर्ण मत मांडले आहे. भारत आणि अमेरिकेमधील ट्रेड डील (व्यापार करार) अंतिम झाल्यास भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी येऊ शकते, असे राजन यांचे म्हणणे आहे. सध्या उच्च टॅरिफमुळे (आयात-निर्यात शुल्क) बाजारावर दबाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

CA कुशल लोढा यांच्याशी संवाद साधताना राजन म्हणाले की, भारतावर सध्या लादले जाणारे टॅरिफ तुलनेने जास्त आहेत. हे टॅरिफ 10 ते 20 टक्क्यांच्या दरम्यान, म्हणजेच इतर देशांप्रमाणे समतोल पातळीवर आणले गेले पाहिजेत. असे झाल्यास परदेशी गुंतवणूकदारांचा (FII) विश्वास पुन्हा वाढेल.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे अमेरिका तेजीत, भारत दबावात

राजन यांच्या मते, सध्या अमेरिकन शेअर बाजारात तेजी आहे, तर भारतीय बाजार तुलनेने स्थिर किंवा दबावात दिसतो. यामागचे प्रमुख कारण म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संदर्भातील प्रचंड अपेक्षा. टेक्नोलॉजी क्षेत्रातील उत्साह सध्या भारतापेक्षा अमेरिकेकडे अधिक झुकलेला आहे.

टेक्नोलॉजीच्या चक्राबाबत बोलताना राजन यांनी डॉट-कॉम बूमचे उदाहरण दिले. “नवीन तंत्रज्ञान येते तेव्हा सुरुवातीला प्रचंड उत्साह असतो, पण पहिल्या टप्प्यात अपेक्षा पूर्ण होत नाहीत. मात्र, काळानुसार तेच तंत्रज्ञान खरा प्रभाव दाखवते,” असे त्यांनी सांगितले. अ‍ॅमेझॉनचे उदाहरण देत ते म्हणाले की, एकेकाळी कंपनीचा शेअर मोठ्या प्रमाणात घसरला होता. पण ज्यांनी दीर्घकाळ संयम ठेवून गुंतवणूक केली, ते आज मोठ्या नफ्यात आहेत. सध्या AI आणि क्लाउड सेवांमुळे अ‍ॅमेझॉन पुन्हा शिखरावर आहे.

भारताची ग्रोथ स्टोरी अजूनही मजबूत

राजन म्हणाले की, काही काळापूर्वी संपूर्ण जग भारताच्या ग्रोथ स्टोरीबाबत उत्साही होते. मात्र, टॅरिफ आणि ट्रेड टेन्शनमुळे सध्या थोडी निराशा दिसते. गेल्या जवळपास एका वर्षापासून भारतीय शेअर बाजार फारसा वाढलेला नाही.
“अमेरिकेसोबत टॅरिफचा मुद्दा सुटला आणि भारताला इतर देशांप्रमाणे समान वागणूक मिळाली, तर परदेशी गुंतवणूक पुन्हा येईल आणि बाजाराला नवी ऊर्जा मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी संदेश

दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत राजन म्हणाले की, शेअर बाजारात चढ-उतार हे कायमचे असतात. कधी बाजार महाग वाटतो, कधी स्वस्त. पण भारताने विकासाचा मार्ग योग्य दिशेने कायम ठेवला, तर दीर्घकाळात शेअर बाजारातून चांगला परतावा मिळणे निश्चित आहे. “लॉन्ग टर्म दृष्टीकोन ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना शेवटी समाधानकारक रिटर्न मिळतो. भारताची मूलभूत ग्रोथ स्टोरी अजूनही मजबूत आहे, फक्त टॅरिफचे ढग दूर होण्याची गरज आहे,” असे राजन यांनी ठामपणे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button