शहर

बदलापूर येथे केमिकल कंपनीत भीषण स्फोट

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पूर्व मधील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीसंदर्भात माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ठाणे: एमआयडीसीमधील येथील पॅसिफिक कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीच्या घटनेनंतरही येथे मोठे स्फोट होत असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 8 ते 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीच्या घटनेनंतर एमआयडीसी परिसरातील नागरिकांना आणि जवळच असलेल्या कामगारांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, आगीत झालेल्या नुकसानीसंदर्भात आणि जीवितहानीबाबतही कुठलही अधिकृत माहिती समोर आली नाही, मात्र स्फोटाने येथील परिसर हादरला आहे

अद्याप आगीचे कारण अस्पष्ट

आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत असल्याने स्थानिकांनीही कंपनीकडे, आग लागल्याच्या ठिकाणी धाव घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button