महाराष्ट्र
Trending

रिपब्लिकन पक्षाची नाराजी दूर करण्यासाठी हालचाली; प्रविण दरेकरांची रामदास आठवलेंशी भेट, उद्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक

मुंबई: मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीत मतभेद निर्माण झाले असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या नाराजीनंतर भाजपने समेटासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआय (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मंगळवारी बांद्रा येथील कार्यालयात भेट घेतली.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील जागावाटपावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांनी नाराजी जाहीर केल्यानंतर महायुतीत खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मंगळवारी बांद्रा येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.

काय झाली चर्चा?

या भेटीत रिपब्लिकन पक्षाने मांडलेल्या आक्षेपांवर सविस्तर चर्चा झाली. आरपीआय (ए) ने स्वबळावर जाहीर केलेल्या ३८ उमेदवारांपैकी मेरीटच्या सुमारे १५ जागांना महायुतीकडून पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उद्या निर्णायक बैठक

या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत रिपब्लिकन पक्षाला काही निवडक जागा सोडण्याबाबत आणि महायुतीतील समन्वयाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

अर्धा तास चर्चा, समेटाचा प्रयत्न

बांद्रा येथील कार्यालयात झालेल्या बैठकीस रिपब्लिकन पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. जवळपास अर्धा तास चाललेल्या चर्चेत आरपीआयची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजप–रिपब्लिकन पक्षाचे संबंध बिघडू नयेत यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप केल्याचे समजते.

आठवलेंची ठाम भूमिका

दरम्यान, रामदास आठवले यांनी स्पष्ट केले की, बीएमसी निवडणुकीत ३८ जागांवर आरपीआय (ए) चे उमेदवार स्वबळावर मैत्रीपूर्ण लढत लढणार आहेत. मात्र, महायुतीसोबत चर्चा सुरू असून तोडगा निघेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button