सेना की मनसे? प्रभाग 217 च्या अधिकृत उमेदवाराचे नाव अद्याप गुलदस्त्यात! शशिकांत पवार नावाची चर्चा

प्रभाग 217 मध्ये ठाकरे शिवसेना गटाने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, शाखाप्रमुख शशिकांत पवार यांना प्रभागातून उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता आणि इच्छा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
मुंबई: 217 प्रभागात मनसेकडून निलेश शिरधनकर इच्छुक असल्याचे म्हंटले जात आहे, परंतु या प्रभागात त्यांचा तितकासा प्रभाव आणि कामकाज फारसे दिसत नाही. त्यामुळे शिवसेना मनसे जागा वाटपात या प्रभागाची जागा उद्धव ठाकरे गटाला मिळाल्यास, शशिकांत पवार यांचा नावाचा उल्लेख सर्वार्थाने होऊन प्रभागात काटेची टक्कर निर्माण होऊ शकते.
तूर्तास, या प्रभागासाठी कोणत्याच उमेदवाराचे नाव जाहीर झाले नसल्यामुळे, शशिकांत पवार देखील एबी फॉर्मसाठी वेटिंगवर असल्याचे दिसून येत आहे. थोडक्यात काय तर, ठाकरे शिवसेना गटातून शशिकांत पवार यांना उमेदवारी मिळाल्यास या प्रभागात ठाकरे गटासाठी विजयाची शक्यता वाढू शकते.
इतर बातमी: मातोश्रीबाहेर उमेदवारीसाठी रडारड; इच्छुक कार्यकर्त्यांची तिकीट मागणी
शशिकांत पवार हे स्थानिक शाखाप्रमुख म्हणून निरंतर संलग्न आहेत, त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा स्थानिक मतदारांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र सध्य स्थितीत उमेदवारांची अधिकृत यादी जारी होत नाही तोवर त्यांच्या प्रत्यक्ष विरोधकांची संपूर्ण ताकद स्पष्ट होत नाही.
भाजपाकडून अस्थानिक उमेदवाराला एबी फॉर्म, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर
इतर पक्षाचा विचार केला तर भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिले 55 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, ज्यात विविध वॉर्ड्स मधील उमेदवारांचा समावेश आहे. मात्र आता या यादीत आणखीन भर पडली असून, त्यामध्ये प्रभाग 217 साठी गौरंग झवेरी यांना भाजपकडून एबी फॉर्म मिळाल्याचे लोढा यांनी जाहीर केले आहे. तसेच 214 साठी अजय पाटील, 215 साठी संतोष ढाले, 219 प्रभागासाठी सनी सानप, 218 प्रभागासाठी स्नेहल तेंडुलकर यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.
इतर बातमी: भाजपाचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! महायुती तुटली
प्रभाग 217 साठी गौरंग झवेरी यांचे नाव स्थानिक नसल्यामुळे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे. तसेच भाजपाकडून आणखीन काही नावांचा यादीत समावेश होऊ शकतो.
ठाकरे गट आणि मनसे यांनी आघाडी जाहीर केले आहे. त्यांच्या यादीमध्ये सध्या काही प्राथमिक उमेदवारांचे जाहीर झालेले नावे असून शिवसेना गट देखील आपल्या काही उमेदवारांची यादी प्रगतीपथावर आहे. मनसेने आपल्या उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जारी करणार असल्याचे संकेत आहेत. काही नेते (जसे नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर) संबंधित बैठकीत एबी फॉर्मसाठी चर्चा करत असल्याचेही समजते.



