भाजपला फुटणार घाम? संभाजी भिंडेच्या धारकऱ्यांचा निवडणुकीत थेट प्रवेश

सांगली महापालिका निवडणुकीत भाजपसाठी चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांच्या “श्री शिवप्रतिष्ठान”चे धारकरी थेट निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भाजपाकडून धारकऱ्यांना फक्त एकच जागा दिल्यामुळे नाराजी पसरली असून आता अपक्ष उमेदवारीसह ते राजकीय रंगभूमीत उतरले आहेत.
सांगली: आज (29 डिसेंबर) राहुल बोळाज यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सुरेंद्र बोळाज आणि इतर धारकऱ्यांनी त्यांना पाठिंबा देत शक्तिप्रदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, “पक्षाने आमचा विचार केला नाही तरी आम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरत आहोत.”
संभाजी भिडे यांचे समर्थक सांगलीमध्ये मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या संस्थेत काम करणाऱ्या तरुणांच्या सक्रियतेमुळे त्यांचे मैदान मजबूत आहे. आता निवडणुकीत थेट उतरल्यामुळे पारंपरिक पक्षांसाठी आव्हान निर्माण होईल.
भाजपसाठी नव्या आव्हानांची सुरुवात
सांगलीत भाजपसाठी आता नव्या आव्हानांची सुरुवात झाली आहे. धारकऱ्यांचा सक्रिय पाठींबा आणि स्थानिक नेटवर्क लक्षात घेतल्यास, काही मतदारांचा कल भाजपकडून अपक्ष धारकऱ्यांकडे वळण्याची शक्यता आहे. यामुळे सांगलीतील महापालिकेतील काही जागांवर भाजपला घाम येण्याची वेळ आली आहे,
धारकऱ्यांमध्ये हिंदुत्व, गोरक्षा, लव्ह जिहाद यांसारख्या सामाजिक मुद्द्यांवर काम करणाऱ्या तरुणांचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीने स्थानिक मतदारांवर परिणाम होऊ शकतो.
सांगलीतील महापालिका निवडणुकीत महायुतीचा आणि भाजपचा दबदबा असला तरी, धारकऱ्यांनी उतरल्याने पक्षीय सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. हे प्रभाग राजकीय रणनितीसाठी महत्त्वाचे मानले जाते.



