देश-विदेश
Trending

मास्टर सरवण सिंहला ‘ऑपरेशन सिंदूर’मधील साहसासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

भारत सरकारने मास्टर श्रवण सिंग (वय 10) ला ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय सैन्यांना केलेल्या सहकार्यासाठी आणि साहसासाठी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ ने सन्मानित केले आहे. हा देशातील लहान मुलांना दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारतर्फे नवी दिल्ली येथे आज राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बालकांना राष्ट्रपति द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत असून, ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय जवानांना दिलेल्या मदतीसाठी पंजाबमधील दहा वर्षीय सरवण सिंहला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

फिरोजपूर जिल्ह्यातील सीमावर्ती गावातील रहिवासी असलेल्या श्रवण सिंहने अल्पवयातच धैर्य आणि देशभक्तीचे दर्शन घडवले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती असताना सरवणने कोणतीही भीती न बाळगता, आपल्या छोट्या सायकलवरून भारतीय जवानांना पाणी, दूध, लस्सी यांसारख्या आवश्यक वस्तू पुरवल्या. तसेच, आपल्या राहत्या घरात त्याने सैनिकांना आधार व विश्रांतीसाठी जागा उपलब्ध करून दिली होती.

सरवणच्या या निस्वार्थ आणि साहसी कृतीची दखल घेत त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार देशातील मुलांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो. असामान्य साहस, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणादायी योगदान देणाऱ्या बालकांना हा पुरस्कार दिला जातो.

राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सरवण सिंह यांना सन्मानित करण्यात येत असताना उपस्थित मान्यवरांकडून त्याच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. दहा वर्षांच्या वयात देशसेवेची भावना जपणाऱ्या श्रवणचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

भारतीय सेनेने शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला

सरवणच्या या जिद्दीला भारतीय सेनेनेही सलाम केला आहे. फिरोजपूर छावणीत आयोजित एका समारंभात पश्चिम कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी या बालकाचा सन्मान केला होता. याच वेळी भारतीय सेनेने सरवणच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

यापूर्वी सरवणने सांगितले होते की, तो मोठा झाल्यावर सैन्यात भरती होऊ इच्छितो. “मी मोठा झाल्यावर फौजी बनून देशाची सेवा करायची आहे,” अशी इच्छा त्याने व्यक्त केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button