देश-विदेश

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना श्वसनाच्या त्रासामुळे दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

नवी दिल्ली: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक खराब झाल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार त्यांच्यावर उपचार होत असून त्यांची स्थिती स्थिर आणि नियंत्रणात आहे.

सोमवारी रात्री त्यांना श्वास घेण्यात त्रास आणि श्वसनातील अस्वस्थता जाणवत असल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या तपासणीनुसार सोनिया गांधी ब्रॉन्कियल अस्थमा (bronchial asthma)ने अनेक वर्षापासून ट्रस्ट असून, सध्या दिल्ली येथील थंड हवामान आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्यांचा त्रास अधिक बळावला होता. मात्र आता त्या स्थिर असून, उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे गंगाराम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले.

सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर पुढे म्हणाले की, ही फार मोठी तातडीची किंवा चिंतेची बाब नाही; त्यांना सामान्य चाचणी आणि दैनंदिन उपचारासाठी रुग्णालयात काही दिवसांसाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्या चेस्ट फिजिशियनच्या (फुफ्फुस तज्ज्ञ) देखरेखीत आहेत.

सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button