रशिया भारत मैत्रीची पायाभरणी काँग्रेसमुळेच! भाजपच्या नेतृत्वावर टीका

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्ह्लादिमीर पुतिन यांच्या भेटीवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, काँग्रेसच्या काळात परंपरेनुसार विरोधी पक्ष नेत्यांना राष्ट्रपती भवनात होणाऱ्या उच्चस्तरीय कार्यक्रमात आमंत्रित केले जात असे, मात्र सध्याच्या सरकारने ही परंपरा मोडली असून लोकशाही व संसदीय प्रोटोकॉलचे उल्लंघन केले जात आहे.
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्ह्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या भारतातील भेटीवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेसच्या काळात परंपरेनुसार विरोधी पक्ष नेत्यांना राष्ट्रपती भवनात होणाऱ्या अशा उच्चस्तरीय भेटींचे आमंत्रण दिले जात असे, मात्र मोदी सरकारच्या अहंकारामुळे ही प्रथा मोडली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गोपाळदादा तिवारी यांनी १९७१च्या युद्धाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “त्या काळात अमेरिकेने बंगालच्या उपसागरात विमानवाहू जहाज पाठवून पाकिस्तानला पाठिंबा दिला, पण भारताच्या सामर्थ्य आणि परराष्ट्र नीतीला पाहून सोव्हिएत रशियाने मदत केली. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या दूरदर्शी परराष्ट्र नीतीमुळे ऑगस्ट १९७१ मध्ये भारत-सोव्हिएत करार होऊ शकला. काँग्रेस काळात रशियासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध भारतासाठी उपयुक्त ठरले.”
ते म्हणाले की, “चीनच्या धमक्यांपासून भारताला संरक्षण देण्यात रशियाचा पाठिंबा महत्त्वाचा होता. सोव्हिएत नौदलाने हिंद महासागरात युद्धनौका तैनात करून अमेरिकेच्या सातव्या ताफ्याला तोंड दिले.”
गोपाळदादा तिवारी यांनी भाजपच्या नेतृत्वावरही टीका केली. ते म्हणाले, “मोदी-शहा नेतृत्व रशियासोबतच्या जुने मैत्रीचे महत्त्व समजून घेतले नाही. पंतप्रधान मोदी यांनी रशिया दौऱ्यादरम्यान २०१४ पूर्वी भारत हतबल असल्याचे सांगून देशाची बदनामी केली.”
यावेळी त्यांनी संसदीय लोकशाही परंपरेचा सुद्धा उल्लेख केला. काँग्रेसकडून विरोधी पक्ष नेत्यांना राष्ट्रपती भवनात नेहमीच आमंत्रण दिले जात असे. पूर्वी अटल बिहारी बाजपेयी, अरुण जेटली, सुषमा स्वराज यांसारखे नेते उपस्थित राहिले होते. मात्र सध्याच्या सरकारने ही परंपरा मोडली, ज्यामुळे संवैधानिक व लोकशाही मूल्यांचे उल्लंघन झाले, असे तिवारी यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे.



