क्रीडा
Trending

WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू! जॉन सीना निवृत्तीच्या उंबरठ्यावर, ‘या’ दिवशी खेळणार शेवटचा सामना

WWE मधील सर्वात लोकप्रिय आणि दिग्गज सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा जॉन सीना आता आपल्या व्यावसायिक रेसलिंग कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. जॉन सीना १३ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या Saturday Night’s Main Event XLII मध्ये आपला शेवटचा WWE सामना खेळणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

जॉन सिनाचा शेवटचा सामना अमेरिकेतील वॉशिंग्टन D.C. येथील Capital One Arena मध्ये होणार असून, WWE इतिहासातील हा सर्वात भावनिक क्षण ठरण्याची शक्यता आहे.

सीनाचा निवृत्ती दौरा, भावनिक शेवट

जॉन सीना लवकरच WWE मधून निवृत्ती घेणार असल्याची अनेक महिन्यापासून चर्चा रंगत होती, मात्र याबद्दल अधिकृत कोणत्याच पद्धतीची माहिती जाहीर झाली नव्हती. मात्र, या संदर्भात अधिकृत माहिती समोर आली असून, या वर्षभरात तो वेगवेगळ्या सामन्याद्वारे आपला निवृत्ती दौरा करण्यात व्यस्त आहे. सिनाने Clash in Paris 2025 मध्ये लोगान पॉलला पराभूत करत आपल्या अंतिम प्रवासाची शानदार सुरूवात केली होती. त्यानंतर त्याने अनेक जुने प्रतिस्पर्धी आणि उदयोन्मुख रेसलर्स यांच्याशी लढत देत चाहत्यांचे मनोरंजन केले. सीनाच्या निवृत्तीच्या बातमीमुळे WWE विश्वात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.

शेवटचा सामना कोणासोबत?

WWE सूत्रांनुसार, जॉन सीनाचा अंतिम सामना Gunther किंवा LA Knight यांच्यापैकी एकासोबत होण्याची शक्यता आहे.
WWE ने संकेत दिले आहेत की हा सामना केवळ ऐतिहासिक नाही, तर सीनाच्या २० हून अधिक वर्षांच्या भव्य कारकिर्दीला दिला जाणारा भव्य निरोप असेल.

सीनाच्या निवृत्तीची मुख्य कारणे

हॉलीवूडमध्ये वाढलेल्या कामकाजाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तसेच शारीरिक क्षमता टिकवून ठेवण्यासाठी तो WWE ला सन्मानाने निरोप देणार आहे. याबाबत स्वतः जॉन सीना गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या चाहत्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या निवृत्तीचे संकेत देत होता. “Time is Now… for the last time,” असे म्हणत त्यांनी चाहत्यांना भावनिक निरोप देण्याची तयारी दाखवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button