
प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोघांचाही बेस प्राइस फक्त 30 लाख रुपये होता. मात्र, जोरदार स्पर्धेमुळे त्यांची किंमत थेट 14.20 कोटींवर पोहोचली. म्हणजेच त्यांच्या किमतीत तब्बल 4,633.33 टक्के वाढ झाली. CSK च्या भविष्यात हे दोघेही महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अबू धाबी: IPL 2026 साठी मंगळवारी पार पडलेल्या मिनी लिलावात अनकॅप्ड खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोघांना प्रत्येकी 14.20 कोटी रुपये मोजून संघात सामील करून घेतले. यामुळे हे दोघे IPL इतिहासातील संयुक्तपणे सर्वात महाग अनकॅप्ड खेळाडू ठरले आहेत.
या मिनी ऑक्शनमध्ये एकूण 369 खेळाडूंवर बोली लागली, त्यापैकी 77 खेळाडू विकले गेले. विकल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये 48 भारतीय तर 29 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. फ्रँचायझींनी या लिलावात एकूण 215.45 कोटी रुपये खर्च केले.
बेस प्राइस 30 लाख, किंमत थेट 14.20 कोटी
प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा या दोघांचाही बेस प्राइस फक्त 30 लाख रुपये होता. मात्र, जोरदार स्पर्धेमुळे त्यांची किंमत थेट 14.20 कोटींवर पोहोचली. म्हणजेच त्यांच्या किमतीत तब्बल 4,633.33 टक्के वाढ झाली. CSK च्या भविष्यात हे दोघेही महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आकिब नबी डारवर दिल्लीची मोठी बोली
जम्मू–काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी डार यालाही मोठी रक्कम मिळाली. दिल्ली कॅपिटल्सने (DC) त्याला 8.40 कोटी रुपये देऊन खरेदी केले. 30 लाखांच्या बेस प्राइसवरून आकिबच्या किमतीत 2,700 टक्के वाढ झाली आहे.
मंगेश यादव RCB मध्ये दाखल
घरगुती क्रिकेटमध्ये यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जाणारा मंगेश यादव याला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) 5.20 कोटी रुपये मोजले. तो यश दयालच्या रिप्लेसमेंट किंवा बॅकअप पर्याय म्हणून संघात दाखल झाल्याचे सांगण्यात येते.
तेजस्वी आणि मुकुललाही संधी
कोलकाता नाइट रायडर्सने तेजस्वी सिंह याला 3 कोटी रुपये देऊन संघात घेतले, तर लखनऊ सुपर जायंट्सने मुकुल चौधरी याला 2.60 कोटी रुपये मोजले.
लिलावातील महागडे अनकॅप्ड खेळाडू
प्रशांत वीर (CSK) – ₹14.20 कोटी
कार्तिक शर्मा (CSK) – ₹14.20 कोटी
आकिब नबी डार (DC) – ₹8.40 कोटी
मंगेश यादव (RCB) – ₹5.20 कोटी
तेजस्वी सिंह (KKR) – ₹3 कोटी
मुकुल चौधरी (LSG) – ₹2.60 कोटी
IPL इतिहासातील सर्वात महाग अनकॅप्ड खेळाडू
प्रशांत वीर – CSK – ₹14.20 कोटी
कार्तिक शर्मा – CSK – ₹14.20 कोटी
आवेश खान – LSG – ₹10 कोटी
कृष्णप्पा गौतम – CSK – ₹9.25 कोटी
शाहरुख खान – PBKS – ₹9 कोटी
राहुल तेवतिया – GT – ₹9 कोटी
क्रुणाल पंड्या – MI – ₹8.8 कोटी
वरुण चक्रवर्ती – PBKS – ₹8.40 कोटी



