
टेकऑफ केल्यानंतर परतण्याचा प्रयत्न करत असताना हे विमान जमिनीवर कोसळले आणि आगीचा भडका उडाला. त्यामध्ये अख्ख्या कुटुंबाचा अंत झाला. या विमानात दिग्गज NASCAR चालक ग्रेग बिफल आणि त्यांचा संपूर्ण कुटुंबीयाबरोबरच त्याचे मित्र व काही परिचितांचा समावेश आहे.
स्टेट्सविले, नॉर्थ कॅरोलिना (एपी): अमेरिकेतील उत्तरी कॅरोलिना राज्यात एक मोठी दुख:द घटना घडली आहे. स्टेट्सविले रिजनल एअरपोर्टजवळ Cessna C550 प्रकाराच्या खासगी विमानाचा भीषण अपघात झाला, ज्यात सातजण मृत्यूमुखी पडले. या अपघातात रेसिंग जगतातला सुपरस्टार आणि पूर्व NASCAR चालक ग्रेग बिफल (वय 55), त्याची पत्नी क्रिस्टीना, मुलगा रायडर (5) आणि मुलगी एम्मा (14) यांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
विमान टेकऑफ केल्यानंतर परतण्याचा प्रयत्न करत असताना ते अचानक जमिनीवर कोसळले आणि आगीचा भडका उडाला. ज्यामुळे ग्रेगच्या अख्ख्या कुटुंबाचा अंत झाला. अपघाताच्या वेळी हवामान रिमझिम आणि ढगाळ होते. हे जेट ग्रेग बिफल यांच्या कंपनीकडे नोंदणीकृत होते. असे असले तरी, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. FAA आणि NTSB या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून, हवामानातील ढगाळ स्थिती आणि दृश्यतेची अडचण अपघाताशी संबंधित घटक असल्याचे प्राथमिक अहवालात दिसून येत आहे.
ग्रेग बिफल हे NASCAR मध्ये अत्यंत प्रतिष्ठित आणि आदरणीय नाव होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ट्रक, Xfinity आणि Cup सिरीजमध्ये अनेक महत्वाचे स्पर्धा जिंकल्या होत्या आणि ते रेसिंग समुदायात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मानले जातात.



