Goa Club Blaze: फरार लुथरा भावंडांना थायलंडमधून ताब्यात घेण्याचे मोठे यश

शनिवारी रात्री उशिरा उत्तर गोव्यातील अर्पोरा गावात लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झालेल्या ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईटक्लबचे संचालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना गुरुवारी थायलंडमध्ये भारतीय कायदा अंमलबजावणी संस्थांच्या विनंतीवरून ताब्यात घेण्यात आले. त्यांना भारतात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
गोवा: गोव्यातील अर्पोरातील बिर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबमध्ये ७ डिसेंबरच्या मध्यरात्री लागलेल्या भयंकर आगीत २५ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्यात २० कर्मचारी, चार पर्यटक आणि एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश होता. या घटनेनंतर क्लबचा मालिक आणि मुख्य आरोपी सौरभ लुथरा व गौरव लुथरा देशाबाहेर पळून गेले होते; परंतु आता थायलंड पोलिसांद्वारे त्यांना फुकेतमधून ताब्यात घेतले असल्याची बातमी समोर येत आहे. त्यांच्याविरुद्ध भारतात प्रत्यार्पण प्रक्रिया सुरु झाली असून लवकरच त्यांना भारतात आणले जाणार आहे.
भारत आणि थायलंडमध्ये २००३ पासून प्रत्यार्पण संधी लागू आहे. या संधीचा आधार घेत भारत सरकारने फुकेतमधील थायलंडच्या अधिकाऱ्यांकडे लूथरा बंधूंना अटक करण्याची विनंती केली होती. भारतीय एजन्सीज थाई अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत. लवकरात लवकर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लूथरा बंधूंना भारतात आणले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
७ डिसेंबरच्या मध्यरात्री क्लबला आग लागली आणि घटनेच्या काही तासांतच, ७ डिसेंबरच्या पहाटे ५:३० वाजता लूथरा बंधूंनी इंडिगोच्या विमानाने थायलंडमधील फुकेत येथे पळ काढला होता. गोव्यातील या संवेदनशील घटनेमुळे राज्याच्या आणि केंद्राच्या दबावानंतर प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने कठोर पाऊले उचलली आहेत. लूथरा बंधूंचा आंतरराष्ट्रीय प्रवास थांबवण्यासाठी भारत सरकारने त्यांचे पासपोर्ट रद्द केले आहेत. यामुळे ते थायलंडबाहेर प्रवास करू शकणार नाहीत. इंटरपोलद्वारे त्यांच्याविरुद्ध ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी करण्यात आली होती.
गोवा पोलिसांनी बुधवारी सांगितले की, आग लागल्यानंतर ९० मिनिटांच्या आत या भावांनी थायलंडला पळून जाण्यासाठी तिकिटे बुक केली . गोवा पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, तपासात असे दिसून आले आहे की लुथरा बंधूंनी ७ डिसेंबर रोजी पहाटे १:१७ वाजता तिकिटे बुक केली. “गोवा पोलिस आणि अग्निशमन सेवा आग विझवत असताना आणि अडकलेल्यांना वाचवत असताना, आरोपी देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होते,” असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
बुधवारी या भावांनी दिल्लीतील रोहिणी न्यायालयात ट्रान्झिट अॅन्टिसिपेटरी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की ते थायलंडला पळाले नाहीत, तर व्यवसायासाठी तिथे गेले होते. न्यायालयाने हे प्रकरण गुरुवारी दुपारपर्यंत ठेवले आहे.
क्लबमधील भागीदार अजय गुप्तासह सहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे . गुप्ताला बुधवारी रात्री गोव्यात आणण्यात आले. ब्रिटीश नागरिक सुरिंदर कुमार खोसला यांच्यासाठी लूकआउट सर्क्युलर जारी करण्यात आला आहे, जो बिर्च बाय रोमियो लेन ज्या मालमत्तेचे मालक आहे.
लुथरा भावंडांवर गंभीर आरोप आणि पुढील कारवाई
दिल्ली कोर्टने लुथरा भावंडांच्या अग्रिम जामीन याचिकाही नाकारल्या आहेत आणि पोलिसांनी त्यांना “फरार” म्हणून घोषित केले आहे. या प्रकरणाची तपासणी गुन्हेगारी लापरवाही, सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि संभाव्य हत्येच्या घटनेपर्यंत वाढली आहे.



