देश-विदेश

नवीन वर्षाच्या स्वागतावेळी स्वित्झर्लंडमध्ये बारमध्ये भीषण स्फोट

नवीन वर्षाच्या स्वागताची संपूर्ण जग जय्यत तयारी करत असताना, एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ती घटना म्हणजे, नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन होत असताना एका बारमध्ये भीषण स्फोट झाला आहे.

क्रॅन्स-मोंटाना: नवीन वर्षाचे स्वागत करत असताना स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध क्रॅन्स-मोंटाना स्की रिसॉर्टमध्ये भीषण दुर्घटना घडली. न्यू इअर पार्टीदरम्यान कॉन्स्टेलेशन नावाच्या बारमध्ये अचानक मोठा स्फोट झाला, त्यानंतर भीषण आग लागली. या आगीत होरपळून अनेक जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत अडकलेल्या नागरिकांना बचाव पथकांनी बाहेर काढले असून जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना मध्यरात्री सुमारे दीड वाजताच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बारमध्ये मोठ्या जल्लोषात पार्टी आयोजित करण्यात आली होती आणि मोठी गर्दी जमली होती. त्याचवेळी स्फोट झाल्याने एकच गोंधळ उडाला. या स्फोटामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button